समुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांचे प्राण वाचविण्यात यश

पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस व रनपार या गावातील एकूण १६ तरुण हे मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स जेटी जवळ ‘सरस्वती’ नामक एका बोटीने समुद्रात फिरण्यासाठी गेले होते.
समुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांचे प्राण वाचविण्यात यश
Published on

रत्नागिरी : पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस व रनपार या गावातील एकूण १६ तरुण हे मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स जेटी जवळ ‘सरस्वती’ नामक एका बोटीने समुद्रात फिरण्यासाठी गेले होते.

समुद्र खवळलेला असल्याने या १६ तरुणांना घेऊन जाणाऱ्या सरस्वती बोटीमध्ये बिघाड निर्माण झाल्याने बोट पलटी झाली व सर्व तरुण पाण्यात ओढले गेले. जवळच असणाऱ्या दुसऱ्या एका ‘अल फरदिन’ या बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी तसेच रत्नागिटी पोलीस दलाचे सुरू असलेले ‘सागर कवच’ अभियान दरम्यान बंदोबस्त कामी सिल्वर सन या पायलट बोटीवर तैनात पोलिसांनी सर्वांना तात्काळ मदत देण्यात आली व बुडत असलेल्या १६ तरुणांना वाचवण्यात मदत करण्यात आलेली आहे. १६ तरुणांना समुद्राच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्या सर्व जणांवर प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

तसेच सरस्वती बोट ही पाण्यात बुडलेली आहे.या घटनेचा अधिक तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in