पाऊस लांबल्याने रत्नागिरीत पाणी संकट; अवघा पंचवीस दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Ratnagiri : निसर्गाने समृद्ध असलेल्या जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती तात्पुरती असली, तरी पावसाचे आगमन लांबल्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
पाऊस लांबल्याने रत्नागिरीत पाणी संकट; अवघा पंचवीस दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
पाऊस लांबल्याने रत्नागिरीत पाणी संकट; अवघा पंचवीस दिवसांचा पाणीसाठा शिल्लक(Photo-X/@InfoRatnagiri)
Published on

रत्नागिरी : निसर्गाने समृद्ध असलेल्या जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती तात्पुरती असली, तरी पावसाचे आगमन लांबल्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी विहिरी, विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

पाणी बचतीचा हा निर्णय प्रशासनाला सहकार्य म्हणून प्रत्येक नागरिकाने पाळावा, अशी अपेक्षा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पाणीटंचाई नियोजनाच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत व्यक्त केली. या बैठकीत जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध साठा, इतर स्रोतामधील पाणीसाठा आणि आवश्यक पाणीपुरवठा याबाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील काही शहरांसाठी पुढील २५ ते ३० दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती नगरपरिषद आणि पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

नगरपालिका, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीने आपापल्या क्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपलब्ध स्रोत आणि टँकरने करावा लागणारा पुरवठा याबाबतचा अहवाल आजच सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य

टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे नियोजन करण्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, रिसॉर्ट्स आणि होम स्टे यांचे जलतरण तलाव असतील, तर त्यांचा नॉन-फूड रिलेटिव्ह पाणीपुरवठा त्वरित थांबवावा. लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि बाहेरून आलेल्या कामगारांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन एमआयडीसी असोसिएशनने आपली मागणी कार्यालयाकडे नोंदवावी, जेणेकरून त्याचे योग्य नियोजन करता येईल. सार्वजनिक पाणीस्रोतांच्या ५०० मीटर परिसरामध्ये असणारे इतर पाण्याचे सोर्स किती आहेत, याची माहिती जल आराखड्यात समाविष्ट करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in