उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? कोर्लईच्या माजी सरपंचांना अटक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लईतील १९ बंगल्याच्या घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंविरुद्ध केले होते गंभीर आरोप
उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? कोर्लईच्या माजी सरपंचांना अटक
Published on

ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भप नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी सरपंचांना अटक केली आहे. रेवदंडा पोलिसांनी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. २४ फेब्रुवारीला तत्कालिन ​​​​​​सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामसेवक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

सोमवारी रात्री रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील १९ बंगल्यांचे खोटे कागदपत्र बनवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी माजी सरपंचांना अटक केली. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्या ६ जणांवर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये ​​​​​​​गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in