रवी राणांची अखेर माघार: बच्च कडू देखील शब्द मागे घेतील ही अपेक्षा

बच्च कडूंनीदेखील आपल्याविरोधात अपशब्द वापरले. तेदेखील आता आपले शब्द जाहीररीत्या मागे घेतली, अशी अपेक्षाही रवी राणा यांनी व्यक्त केली
रवी राणांची अखेर माघार: बच्च कडू देखील शब्द मागे घेतील ही अपेक्षा

गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या रवी राणा व बच्चू कडू वादावर अखेर पडला आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबद्दल आपण जे काही शब्द बोललो ते मागे घेत असल्याचे सांगितले.

तसेच, बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केल्याबद्दल रवी राणांनी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, बच्च कडूंनीदेखील आपल्याविरोधात अपशब्द वापरले. तेदेखील आता आपले शब्द जाहीररीत्या मागे घेतली, अशी अपेक्षाही रवी राणा यांनी व्यक्त केली.

फडणवीसांचे आदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज रवी राणा यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना रवी राणा यांनी सांगितले की, गेल्या 8-10 दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरू होते. शब्दाला शब्द लागत होते. या वादासंदर्भात काल जवळपास साडे तीन तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आज चर्चा केली. दोघांनी आपापले वाद मिटवण्याचे सांगितले आहे. शिंदे व फडणवीस दोघेही माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार दिलगिरी व्यक्त करत हा विषय आता संपवत आहे.

कडूही शब्द मागे घेतील

रवी राणा यांनी यावेळी बच्चू कडूंनीही माझ्याविरोधात जे अपशब्द वापरले ते मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. रवी राणा म्हणाले, बच्चू कडू यांच्या तोंडूनसुद्धा माझ्याविरोधात अपशब्द निघाले. मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो, असा आरोप कडूंनी केला. आता तेदेखील आपले शब्द माघे घेतली, अशी अपेक्षा आहे. आम्ही दोघेही सरकारसोबत, मुख्यमंत्री शिंदे व देवेंद्र फडणवीसांसोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत.

दोघेही सरकारसोबत

रवी राणा म्हणाले, गेल्या तीन महिन्यांत शिंदे-फडणीस सरकारने महाराष्ट्राला वेगाने पुढे नेण्याचे काम केले आहे. आपापसातील वादामुळे वातावरण खराब होते. त्यामुळे महाराष्ट्रावरही याचा परिणाम होत होता. त्यामुळे आता प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढून पुढे जाण्याचे आम्ही निश्चित केले आहे. फडणवीसांनी देखील आपापसातील वाद मिटले पाहीजेत, असे सांगितले आहे. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांत जनतेची कामे झाले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळावा, यासाठी सरकारसोबत आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहू.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in