रविकांत तुपकर आणि सहकाऱ्यांची आज होणार सुटका ? काय म्हणाले न्यायालय

आत्मदहन आंदोलनामुळे 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागली
रविकांत तुपकर आणि सहकाऱ्यांची आज होणार सुटका ? काय म्हणाले न्यायालय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने तुपकर आणि त्यांच्या सर्व साथीदारांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना अटक केली. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत आहेत. या सर्वांची आज संध्याकाळी सुटका होण्याची शक्यता आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नावर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी शनिवारी (11 फेब्रुवारी) आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर तुपकरसह 25 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आत्मदहन आंदोलनामुळे 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागली आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला यश आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in