रविकांत तुपकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला
रविकांत तुपकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर पोलिसांच्या वेशात आले आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले. सध्या पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण :

रविकांत तुपकर यांनी सरकारला 10 फेब्रुवारीपर्यंत दिलेला कापूस, सोयाबीन आणि पीक विमा या प्रश्नांवर अल्टिमेटम दिला होता, तो अल्टिमेटम संपला. गेल्या चार दिवसांपासून तुपकर भूमिगत होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. आज रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबईतील एआयसी पीक विमा कंपनी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला. तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. 11 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकरी जमा झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in