रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष? बावनकुळेंना मंत्रिपद मिळाल्याने चव्हाण यांच्या नावाची चर्चा
नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी संध्याकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी भाजप प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्यावर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे समजते. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार आहेत. याआधी त्यांनी २००९, २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. रवींद्र चव्हाण हे यापूर्वी वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे राज्यमंत्री राहिले आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्यात तसेच शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद असलेल्या चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आली होती. रविंद्र चव्हाण हे २००७ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००७ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असलेल्या चव्हाणांकडे स्थायी समितीचे सभापतीपद आले होते. २००९मध्ये तत्कालीन भाजप आमदार अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस लायब्ररीतून अतिरेक्यांनी ही शस्त्रे लुटली होती. चकमकीत जखमी झालेल्या लश्राम प्रेम या अतिरेक्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कोकणातील महायुतीच्या यशात महत्त्वाची भूमिका
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील ३९ पैकी ३५ जागा महायुतीला जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता २०२९ च्या निवडणुकीत शत प्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाण यांना जबाबदारी दिली जाणार आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.