भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण; अधिकृत घोषणा आज होणार

विधानसभा निवडणुकीआधी रवींद्र चव्हाण यांच्यावर कार्याध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष कोण? अशी चर्चा सुरू असताना सोमवारी रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण; अधिकृत घोषणा आज होणार
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी रवींद्र चव्हाण यांच्यावर कार्याध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष कोण? अशी चर्चा सुरू असताना सोमवारी रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेत ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

भाजपला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असून, रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी निरीक्षक म्हणून हजेरी लावली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. मंगळवारी संध्याकाळी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे. चव्हाण यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर ते नगरसेवक झाले, नंतर आमदार झाले.

logo
marathi.freepressjournal.in