१०१६ मेट्रिक टन आंब्याची विक्रमी निर्यात; लासलगाव येथून तीन देशांमध्ये हापूस आणि केशर आंबा रवाना

भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) कृषक विकिरण केंद्रातून चालू हंगामात अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १,०१६ मेट्रिक टन हापूस आणि केशर आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून सुमारे तीन लाख बॉक्स आंब्याची अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया या देशांमध्ये निर्यात करण्यात आली आहे.
१०१६ मेट्रिक टन आंब्याची विक्रमी निर्यात; लासलगाव येथून तीन देशांमध्ये हापूस आणि केशर आंबा रवाना
१०१६ मेट्रिक टन आंब्याची विक्रमी निर्यात; लासलगाव येथून तीन देशांमध्ये हापूस आणि केशर आंबा रवाना
Published on

हारून शेख / लासलगाव

भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) कृषक विकिरण केंद्रातून चालू हंगामात अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १,०१६ मेट्रिक टन हापूस आणि केशर आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून सुमारे तीन लाख बॉक्स आंब्याची अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया या देशांमध्ये निर्यात करण्यात आली आहे. ही माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

यंदा अमेरिकेत सर्वाधिक ९९७ मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आली, ऑस्ट्रेलियाला १३ मेट्रिक टन आणि मलेशियाला तीन मेट्रिक टन आंबा पाठविण्यात आला आहे. तर लासलगाव येथील विकिरण केंद्रात २००२ ते २००६ या कालावधीत सुरुवातीला कांद्यावर विकिरण प्रक्रिया केली जात होती. त्यानंतर २००७ पासून आंब्यावरही प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीला हा प्रकल्प भाभा अणुसंशोधन केंद्र आणि पणन मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येत होता. नंतर तो खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यात आला असून सध्या हिंदुस्थान अॅग्रो लिमिटेड ही कंपनी या केंद्राचे संचालन करीत आहे.

आवश्यक मागील वर्षी प्रमाणपत्रे वेळेत न मिळाल्यामुळे आंब्याची निर्यात होऊ शकली नव्हती. मात्र, यंदा अमेरिकेच्या कृषी व वनस्पती सुरक्षा निकषांनुसार आवश्यक तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लासलगाव केंद्राची पाहणी करून आवश्यक प्रमाणपत्र दिल्यानंतर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला.

logo
marathi.freepressjournal.in