
मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात मौसमी वारे संपूर्ण राज्य व्यापतील. तसेच, पुढील चार दिवस मुंबईसह राज्यभरात ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात रेड अलर्ट, रत्नागिरी पट्ट्यात ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, पालघर, मुंबईत पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत पावसाच्या सरी कोसळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढणार असून मुंबईसह राज्यभरात दमदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील दोन दिवस मुंबई शहर व उपनगरांत पावसाची रिपरिप सुरू आहे. येत्या २४ तासांत पाऊस सक्रिय होत जोरदार कोसळेल. २४ व २५ जून रोजी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शहर, उपनगरात २६ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या
> शहरात ३, पूर्व उपनगरांत ११ व पश्चिम उपनगरांत १२ अशा एकूण २६ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. या घटनेत कोणाला दुखापत झालेली नाही.
> घर दुर्घटना - पूर्व उपनगरांत २ व पश्चिम ३ अशा एकूण ५ ठिकाणी घरांच्या भिंतींचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.