नोंदणीकृत एजंट ५० हजारांवर; महाराष्ट्रात महारेराचे सर्वाधिक एजंट

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात राज्यातील एजंटसह देशाच्या विविध राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटचाही समावेश आहे. सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरातील हे एजंट आहेत.
नोंदणीकृत एजंट ५० हजारांवर; महाराष्ट्रात महारेराचे सर्वाधिक एजंट
Published on

मुंबई : महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात राज्यातील एजंटसह देशाच्या विविध राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटचाही समावेश आहे. सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरातील हे एजंट आहेत.

गृहनिर्माण प्रकल्पांप्रमाणेच नोंदणीकृत एजंटची संख्याही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. सध्या महारेराकडे ५० हजार ६७४३ एजंट नोंदणीकृत आहेत. पैकी ३१ हजार ९८० एजंट सक्रिय असून १८,६९३ एजंटची नोंदणी विविध कारणास्तव महारेराने रद्द केली आहे.

यात मुंबई महानगरचा समावेश असलेल्या कोकणात २१ हजार ५० असे सर्वाधिक एजंट आहेत. त्यानंतर पुणे परिसरात ८,२०५, नागपूर परिसरात १,५०४, उत्तर महाराष्ट्रात ४९०, छत्रपती संभाजीनगर परिसरात ३४३ आणि अमरावती परिसरात २३७ एजंट नोंदणीकृत आहेत.

१८ हजार ६९३ पैकी काहींनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले नाही आणि काहींनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही म्हणून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.

स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्या संपर्कात येतात. माहितीच्या आधारे ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in