राज्यातील एससी, एसटी व एनटी विद्यार्थ्यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्यास मिळणार मुदतवाढ

एससी, एसटी व एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल आणि उद्या शासनाकडून आदेश देण्यात येतील...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ न दिल्याने राज्यातील एससी, एसटी व एनटी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मात्र आता हे जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देणार असल्याचे आश्वासन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

वर्ष २०२४ -२५ मध्ये जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याची मुदत एससी, एसटी आणि एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरकारकडून वाढवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचे वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर या विषयी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी फोन वरून चर्चा झाली. यावेळी सौनिक यांनी एससी, एसटी व एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल आणि उद्या शासनाकडून आदेश देण्यात येतील, असे मुख्य सचिव यांनी सांगितल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in