एसटीच्या लाखो प्रवाशांना दिलासा! आता रिझर्व्हेशन तिकीट 'इथूनही' करता येणार बूक

आता एसटीच्या प्रवाशांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावर तिकीट आरक्षण करणे शक्य होणार आहे.
एसटीच्या लाखो प्रवाशांना दिलासा! आता रिझर्व्हेशन तिकीट 'इथूनही' करता येणार बूक

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. आता एसटीच्या प्रवाशांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावर तिकीट आरक्षण करणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ व आयआरसीटीसी यांच्यात सामजंस्य करार करण्यात आला.

रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटदेखिल आरक्षित करता येणार आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन प्रवाशांना एसटीचे तिकीटदेखील आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पराग जैन नैनुटिया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह आयआरसीटीसीच्या व्यवस्थापकीय संचालक सीमा कुमार या उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in