ठाकरे गटाला दिलासा,पक्षनिधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

सरकारी कंपनी वगळता अन्य कोणतीही व्यक्ती अथवा कंपनीकडून स्वेच्छेने दिलेली कितीही रकमेची देणगी स्वीकारण्यास गुरुवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेला (उबाठा) परवानगी दिली.
ठाकरे गटाला दिलासा,पक्षनिधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाची परवानगी
उद्धव ठाकरे
Published on

नवी दिल्ली : सरकारी कंपनी वगळता अन्य कोणतीही व्यक्ती अथवा कंपनीकडून स्वेच्छेने दिलेली कितीही रकमेची देणगी स्वीकारण्यास गुरुवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेला (उबाठा) परवानगी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) काही दिवसांपूर्वीच अशी परवानगी देण्यात आली होती.

लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. जनतेकडून ऐच्छिक देणगी स्वीकारण्याची परवानगी देणारे प्रमाणपत्र द्यावे अथवा तसे जाहीर करावे, अशी विनंती शिवसेनेने (उबाठा) निवडणूक आयोगाला केली होती.

शिवसेना (उबाठा) नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेकडून देणगी स्वीकारण्याची अनुमती देण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in