औरंगजेबची कबर स्मारकाच्या यादीतून वगळा; राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

औरंगजेबचा मुद्दा गरम असून त्याची कबर हटवण्याची मागणी देशभरातून होत आहे. त्यातच आता माजी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी औरंगजेबची कबर स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
औरंगजेबची कबर स्मारकाच्या यादीतून वगळा; राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी
Published on

मुंबई : औरंगजेबचा मुद्दा गरम असून त्याची कबर हटवण्याची मागणी देशभरातून होत आहे. त्यातच आता माजी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी औरंगजेबची कबर स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत नवी दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन शेवाळे यांनी लेखी निवेदन सादर केले.

औरंगजेबाने, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा तब्बल ४० दिवस अमानुष छळ केला. छत्रपती संभाजी राजेंनी अखेर मृत्यूला मिठी मारली, मात्र धर्मांतर केले नाही. अतिशय क्रूर, अंधश्रद्धाळू आणि धर्मवेड्या औरंगजेबाच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या अनेक घटना इतिहासात नोंद केल्या आहेत. अशा क्रूरकर्मा मुघल शासकाची छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथील कबर त्वरित हटवावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. मात्र, प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीक स्थळे आणि अवशेष कायदा, १९५८ नुसार ही कबर राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत आहे. या कबरीला संरक्षित स्मारकांच्या यादीत नेमके केव्हा आणि कसे स्थान देण्यात आले, याबाबत काहीच ठोस पुरावा उपलब्ध नाही, असेही शेवाळे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in