कोविड टास्कफोर्सची पुनर्रचना ;अध्यक्षपदी डॉ.रमण गंगाखेडकर

राज्यातील कोविड रूग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. राज्य सरकारने कोविड रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून आरोग्ययंत्रणाही सज्ज ठेवली
कोविड टास्कफोर्सची पुनर्रचना ;अध्यक्षपदी डॉ.रमण गंगाखेडकर
PM

मुंबई : राज्यातील कोविड रूग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. राज्य सरकारने कोविड रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून आरोग्ययंत्रणाही सज्ज ठेवली आहे. तसेच राज्यातील कोविड टास्कफोर्सचीही पुनर्रचना केली असून टास्कफोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ.रमण गंगाखेडकर यांना नेमण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफटनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर या देखील या फोर्सच्या सदस्य असणार आहेत. गंभीर व अतिगंभीर आजारी रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल तयार करण्यासोबतच इतर कामेही या टास्कफोर्समार्फत केली जाणार आहेत.

राज्यात देखील कोविड रुग्णांची संख्या आता डोके वर काढू लागली आहे. शाळांना नाताळच्या असलेल्या सुट्ट्या तसेच तोंडावर आलेल्या नववर्ष दिनानिमित्ताने सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. यामुळे कोविडचा प्रसार वाढण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोविड रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून आरोग्ययंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच आता आधीच स्थापन करण्यात आलेल्या कोविड टास्कफोर्सची पुनर्रचनाही केली आहे.

टास्कफोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन  परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ.रमण गंगाखेडकर यांना नेमण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफटनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर या देखील या फोर्सच्या सदस्य असणार आहेत. सोबतच वैदयकिय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई (डीएमईआर)चे संचालक, बी.जे.मेडिकल कॉलेज पुणेचे डॉ.राजेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेजच्या डॉ.वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेजचे डॉ.डी.बी.कदम हे देखील सदस्य असणार आहेत. आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईचे आयुक्त या टास्कफोर्सचे सदस्य सचिव असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in