बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार ; आरोपी शिक्षकाला अटक

या घटनेनंतर बुलढाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार ; आरोपी शिक्षकाला अटक

बुलढाण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील शिक्षकाला पोलिसांनी चांगलाचा धडा शिकवून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर बुलढाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. पालकांच्या मदतीने पीडित मुलीने पोलिसांत या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेतील शिकक्षाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीने बुलढाला पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपीला पोक्सो काद्यांतर्गत अटक केली आहे. पीडित मुलीने मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी बुलढाला पोलिसांनी आरोपी शिक्षक सतीश विक्रम मोरे यांच्यावर बुलढाणा पोलीस ठाण्यात कारवाई सुरु केली आहे. पीडीता ही तेरा वर्षाची असून आठवीत शिक्षण घेत होती.

आरोपी शिक्षकाने मुलीला जवळ बोलवून बोलेरो कारमध्ये बलात्कार केला. तिचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने पालकांना सर्व घटना सांगितली. पालकांनी जिल्हा पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच शिक्षकाला नोकरीतून निलंबीत करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in