प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडनिमित्त महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ

रेडबसकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, या कालावधीत महाराष्ट्र आणि गोव्यातील बस बुकिंगमध्ये ४६ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडनिमित्त महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ
(Photo-https://www.redbus.in/blog/)
Published on

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. रेडबसकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, या कालावधीत महाराष्ट्र आणि गोव्यातील बस बुकिंगमध्ये ४६ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे विश्लेषण २०२६ मध्ये २३ ते २६ जानेवारी या कालावधीत करण्यात आलेल्या बुकिंग्सची तुलना मागील वर्षीच्या २४ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीतील बुकिंग्सशी करून सादर करण्यात आले आहे. या आकडेवारीवरून लाँग विकेंडदरम्यान प्रवासासाठी बस हे माध्यम प्रवाशांच्या प्राधान्यक्रमात कायम असल्याचे स्पष्ट होते.

प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत प्रवासाची मागणी वाढत असताना, रेडबसतर्फे ८ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘डिस्कव्हर भारत सेल’ सुरू करण्यात आला आहे. या कालावधीत भारतभरातील प्रवासाचे पर्याय २९९ रुपये प्रति सीट या दरापासून उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सवलतीच्या कालावधीत बस, रेल्वे आणि हॉटेल बुकिंगवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत असून, निवडक बँका आणि पेमेंट भागीदारांमार्फत अतिरिक्त बचतीचे पर्यायही उपलब्ध आहेत.

रेडबसच्या व्यासपीठावरील बुकिंग्सनुसार, गोवा-पुणे, पुणे-हैदराबाद, मुंबई-हैदराबाद, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई, नागपूर-पुणे आणि मुंबई-पुणे हे मार्ग या कालावधीत अधिक मागणीचे ठरत असल्याचे दिसून येते. तसेच, पुण्यातील वाकड आणि स्वारगेट, गोव्यातील मापुसा आणि आशीर्वाद थिएटर, तसेच मुंबईतील बोरिवली पूर्व ही बसमध्ये चढण्यासाठी प्रमुख ठिकाणे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

प्रवाशांच्या प्राधान्यक्रमाचा विचार करता, एकूण बुकिंगपैकी ८४ टक्के बुकिंग्स वातानुकूलित बसेससाठी करण्यात आली आहेत, तर उर्वरित बुकिंग्स नॉन-एसी बसेससाठी आहेत. यावरून आगाऊ आरक्षण करताना प्रवासी अधिक आरामदायी पर्यायांना पसंती देत असल्याचे स्पष्ट होते. याचप्रमाणे, ८९ टक्के प्रवाशांनी स्लीपर बसचा पर्याय निवडला असून, उर्वरित प्रवाशांनी सीटर सेवा स्वीकारली आहे. सुटीच्या काळात रात्रीच्या प्रवासाकडे प्रवाशांचा वाढता कल असल्याचे यातून दिसून येते.

प्रवाशांच्या लोकसंख्यात्मक आकडेवारीनुसार, बस बुकिंगमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण ६८ टक्के असून महिला प्रवाशांचे प्रमाण ३२ टक्के आहे. शहरनिहाय पाहता, प्रथम श्रेणी महानगरांमधून ४८ टक्के प्रवासी प्रवास करत असल्याचे दिसून येते, तर द्वितीय श्रेणी शहरांमधून २२ टक्के आणि तृतीय श्रेणी शहरे तसेच ग्रामीण भागातून ३० टक्के प्रवासी बस प्रवास करत आहेत. यावरून महानगरांमध्ये प्रवासाची मागणी अधिक असल्याचे तसेच छोट्या शहरांमधील बाजारपेठही हळूहळू विस्तारत असल्याचे चित्र स्पष्ट होते.

logo
marathi.freepressjournal.in