"महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं", देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सातव्यांदा विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातून सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
"महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं", देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सातव्यांदा विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला होता त्यामुळे मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातून सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हातून आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. तर, दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हातून महापूजा झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रशासनाच्या मदतीने अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा करण्यात आली आहे. आज पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा केली आहे.शिवाय आता उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने, फडणवीस यांच्या हस्ते सातव्यांदा ही महापूजा झाली आहे.

यावर्षीच्या कार्तिकी एकादशीला महापुजेसाठी आमंत्रण देतांना मंदिर समिती फारच अडचणीत आली होती. सध्या राज्य सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणाला आमंत्रण द्यायचं असा गंभीर प्रश्न मंदिर समितीला पडला होता. शेवटी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचं समोर आलं आहे . यापूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांना देखील कार्तिकी एकादशीच्या महापुजेची संधी मिळालेली आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना कोरोना काळात दोनवेळा अजित पवार महापूजेला आले होते. त्यापूर्वी एकदा त्यांना संधी मिळाली होती. त्यामुळे आतापर्यंत तीनवेळा अजित पवार यांच्या हातून महापूजा संपन्न झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in