
नालंदा : नालंदा जिल्ह्यात चार वर्षांचा शिवम हा मुलगा १५० बोअरवेलमध्ये पडला होता. एनडीआरएफच्या पथकाने ८ तासांच्या प्रयत्नानंतर त्याला सुखरूप बाहेर काढले. नालंदा जिल्ह्यातील भदारी गावात शिवम बोअरवेलमध्ये पडल्याचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी तात्काळ प्रयत्न सुरू केले, मात्र त्यांच्याकडे आवश्यक सामुग्री नव्हती. अखेर एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी बोअरवेलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला, तर दुसऱ्या बाजूला खोदाई सुरू केली. एनडीआरएफच्या तज्ज्ञांनी विशेष प्रयत्न करून शिवमला बाहेर काढले.