स्त्रीरोग तज्ज्ञाला सोनोग्राफी मशीन तत्काळ परत द्या; HC च्या कोल्हापूर खंडपीठाचे आदेश; गर्भलिंग चाचणी केल्याचा होता संशय

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सर्किट बेंचच्या खंडपीठाने मशीन जप्त करून ठेवल्याने कोणताही उद्देश साध्य होणार नाही.सोनोग्राफी मशीन असणे हे स्त्रीरोग तज्ज्ञाच्या व्यवसायाची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवले. मशीनमधील डेटा हा पुराव्याचा भाग आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांनी मशीन त्याचबरोबर त्यातील माहितीशी कोणती छेडछाड करू नये, अशी अट घालत जप्त केलेले सोनोग्राफी मशीन परत करण्याचे आदेश दिले.
स्त्रीरोग तज्ज्ञाला सोनोग्राफी मशीन तत्काळ परत द्या; HC च्या कोल्हापूर खंडपीठाचे आदेश; गर्भलिंग चाचणी केल्याचा होता संशय
स्त्रीरोग तज्ज्ञाला सोनोग्राफी मशीन तत्काळ परत द्या; HC च्या कोल्हापूर खंडपीठाचे आदेश; गर्भलिंग चाचणी केल्याचा होता संशय उच्च न्यायालयाचे संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : जयसिंगपूर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शांतमती पाटील यांचे दीड वर्षापूर्वी जप्त केलेले अल्ट्रा सोनोग्राफी मशीन तत्काळ परत देण्याचे आदेश आरोग्य खात्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर येथील न्या. मकरंद कर्णिक व न्या अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने दिले.

डॉ. शांतमती पाटील यांच्या हॉस्पिटलवर गेल्या वर्षी एका संशयित केसवरून सिव्हिल सर्जन कोल्हापूर व वैद्यकीय अधीक्षक शिरोळ ग्रामीण रुग्णालय यांच्या पथकाने २५ जुलैला छापा टाकून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कथितरीत्या अनियमितता आढळल्याने त्यांचे सर्व रेकॉर्ड त्याचबरोबर सोनोग्राफी मशीन जप्त केले. त्यांच्या विरोधात कोणती सुनावणी न करता हे सोनोग्राफी मशीन शिरोळ ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यानंतर डॉ. पाटील यांच्यावर जयसिंगपूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदे अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली.

सोनोग्राफी मशीन ही व्यवसायाची गरज

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सर्किट बेंचच्या खंडपीठाने मशीन जप्त करून ठेवल्याने कोणताही उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे मशीन परत करण्यास कोणतीही अडचण नसण्याचे स्पष्ट केले. सोनोग्राफी मशीन असणे हे स्त्रीरोग तज्ज्ञाच्या व्यवसायाची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवले. मशीनमधील डेटा हा पुराव्याचा भाग आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांनी मशीन त्याचबरोबर त्यातील माहितीशी कोणती छेडछाड करू नये, अशी अट घालत जप्त केलेले सोनोग्राफी मशीन परत करण्याचे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in