खटाव तालुक्यातील वाळू माफियांना ‘महसूल’चा दणका; १३ लाख ४० हजारांचा ठोठावला दंड

नढवळ (ता. खटाव) गावचे हद्दीत गावठाण नदी, ओढ्यामध्ये अवैधरीत्या गौण खनिज वाळू उत्खनन चालू असत्याची महिती मिळाल्याने या माहितीच्या आधारे मंडलाधिकारी महेश चाटे व तलाठी अक्षय साळुंखे हे कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला.
खटाव तालुक्यातील वाळू माफियांना ‘महसूल’चा दणका; १३ लाख ४० हजारांचा ठोठावला दंड

कराड : खटाव तालुक्यातील नढवढ याठिकाणी वाळू माफियांनी निमसोडचे मंडलाधिकारी व नढवळचे तलाठी यांच्यावर जीवघेणा हत्ला केल्याने केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी वडूज पोलिसांत वाळू माफियांवर गुन्हा दाखल कण्यात आला असला तरी इतक्या दिवस डाराडूर झोपेत असलेला महसूल विभाग खडबडून जागा होत या प्रकणात संबधित वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यात आली असून त्यांना १३ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नढवळ (ता. खटाव) गावचे हद्दीत गावठाण नदी, ओढ्यामध्ये अवैधरीत्या गौण खनिज वाळू उत्खनन चालू असत्याची महिती मिळाल्याने या माहितीच्या आधारे मंडलाधिकारी महेश चाटे व तलाठी अक्षय साळुंखे हे कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मंडलाधिकारी, तलाठी गंभीर जखमी झाले होते. महेश गोडसे, हेमंत उर्फ सोन्या कच्छी व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करून त्यांना न्यायालयात हजर कण्यात आते होते. त्यात त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली होती तर वडूज पेलिसांनी उर्वरित आरोपींची शोधमोहीम हाती घेतल्यानंतर काही संशयित लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून व एक जेसीबी, एक ट्रॅक्टर जप्त कण्यात आला आहे. खटावच्या तहसीलदार बाई माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर एकूण १३ लाख ४० हजार ५३० रुपयांचा दंड आकारण्यात आला असत्याची माहिती दिली तर संबंधिताविरुद्ध नोटीस काढण्यात आली आहे.

त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि सदर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू असल्याच्या खात्रीशीर हालचाली सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in