भाजप नेत्याच्या वाळू अड्ड्यावर महसूलचा छापा

भाजपचे वाई तालुका अध्यक्ष असलेले दिपक ननावरे यांनी आसले ता. वाई येथील कृष्णानदी पात्रात वाळू ऊपसा करण्याचा ठेका घेतला होता
भाजप नेत्याच्या वाळू अड्ड्यावर महसूलचा छापा

कराड : राज्यातील 'सत्ताधारी' भाजपचे वाई तालुका अध्यक्ष असलेले दीपक ननावरे हे मशिनरीच्या साह्याने ओझर्डे, ता. वाई गावच्या हद्दीत दिवसा चोरून वाळू उपसा करत असताना 'महसूल' विभागाच्या पथकाने छापा टाकला. यात एक पोकलेन, दोन ट्रॅक्टर, एक डंपर आणी अंदाजे १५ ब्रास वाळूचा साठा, असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केल्याने वाळू तस्करांसह राजकीय क्षेत्रातही चांगलीच खळबळ उडाली आहे. सर्व जप्त मुद्देमाल वाई तहसीलदारांनकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवणाऱ्या दिपक ननावरे याने कारवाईसाठी गेलेल्या ओझर्डे गावच्या महिला मंडलाधिकारी शितल अडसुळ व तलाठी यांना दमबाजी आणी शिवीगाळ केल्याने व या प्रकरणी घडलेल्या गंभीर घटनेची माहिती वाई तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष असलेले गणेश अंबटवार यांना समजताच तेही तातडीने घटना स्थळावर दाखल झाले . दिपक ननावरे याच्या वृत्ती आणी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत प्रशासनाने कडक कारवाईची मागणी केल्याने या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे.

भाजपचे वाई तालुका अध्यक्ष असलेले दिपक ननावरे यांनी आसले ता. वाई येथील कृष्णानदी पात्रात वाळू ऊपसा करण्याचा ठेका घेतला होता. पण या ठेकेदाराला शासनाने ज्या ठिकाणचा ठेका दिला होता; त्या जागेवर हा ठेकेदार वाळु उपसा न करता त्याने शासकीय यंत्रणेशी लबाडी आणी फसवणूक करून विनापरवाना ओझर्डे ता. वाई गावच्या हद्दीतील नदी पात्रात पोकलेनच्या साह्याने वाळू काढण्यास सुरुवात केली होती. याबाबतची माहिती ओझर्डे गावचे तलाठी संदीप फाजगे यांना मिळाल्याने त्यांनी मंडलाधिकारी शितल अडसुळ, गावचे पोलीस पाटील कोदे, ग्रामस्थ शिवाजी पिसाळ आणि कोतवाल महेश गुरव या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी या वाळू उपसा ठिकाणावर धाड टाकली. या कारवाईत एकूण १ कोटी रुपयांचा मुद्दे माल जप्त केला व तो मुद्देमाल वाई तहसिल कार्यालयात जमा करण्यात आला आहे; मात्र या कारवाई दरम्यान उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नजर चुकवून दिपक ननावरे हा पळून गेला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in