मुंबई : राज्यात झिका विषाणूचा प्रसार होत असून, जानेवारी ते आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १८ रुग्ण पुण्यात आढळले आहेत. एडिस डासांमुळे झिका विषाणूजन्य आजाराचा फैलाव होतो. कीटक व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या एडिस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत.
राज्यात झिका विषाणूजन्य आजाराने पाय रोवले असून, सात महिन्यांत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. झिका विषाणूजन्य आजार धोकादायक नसला, तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. झिका विषाणूजन्य आजाराला रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
झिका रोगाचा प्रसार
झिका विषाणू हा प्रामुख्याने एडिस या डासांच्या चाव्याद्वारे होतो. एडिस डास सहसा दिवसा चावतात.
प्रसाराची मुख्य कारणे
लैंगिक संपर्काद्वारे गर्भधारणेदरम्यान आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो.
रक्त आणि रक्त उत्पादनांचे रक्त संक्रमण अवयव प्रत्यारोपणाद्वारे.
लक्षणे
त्वचेवर पुरळ येणे आणि त्याला खाज येणे.
सर्दीसोबतच तापही असणे.
खूप घाम येणे.
स्नायूंमध्ये वेदना असणे.
तीव्र डोकेदुखी आणि खूप थकवा.
भूक कमी होणे किंवा काही खाण्याची इच्छा न होणे.
झिका आजाराचे उपचार
- रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
-निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
-तापासाठी पॅरासिटामॉल औषध वापरावे.
-ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.
-कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका.
प्रतिबंधात्मक उपाययोजना!
-ताप सर्वेक्षण मोहिमेत रुग्णाच्या ३-५ किमी भागांत सर्वेक्षण करून रक्ताचे नमुने गोळा करण्यात येतात.
-रुग्णांच्या लक्षणावर आधारित उपचार
-गर्भवती महिला व जननक्षम जोडप्यांना या आजारातील धोक्यांच्या बाबत मार्गदर्शन
-एडिस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी कीटक शास्त्रीय उपाययोजना