रितेशच्या अश्रूंनी काका-पुतण्या नात्याला नवा आयाम! विलासरावांच्या आठवणींचा गहिवर

दुर्दैवाने विलासराव कालवश झाले.त्यानंतर राजकीय वारसदारीवरुन देशमुख परिवारात काका-पुतण्यांत संघर्ष होईल,असा अनेकांचा कयास होता.
रितेशच्या अश्रूंनी काका-पुतण्या नात्याला नवा आयाम! विलासरावांच्या आठवणींचा गहिवर

राजा माने/मुंबई : काका-पुतण्यांचे नाते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अर्थांने गाजत असतानाच अभिनेता रितेश विलासराव देशमुख याला रविवारी (दि. १८) आपल्या वडिलांच्या आठवणी जागवताना अश्रू अनावर झाले. वडिलांनतर काका दिलीपरावांनी दिलेल्या खंबीर आधाराच्या भावना व्यक्त करताना तो हुंदके रोखू शकला नाही.त्याला सावरायला त्याचा मोठा भाऊ आ.अमित यांना त्याच्याजवळ लागले.राज्भरातील भाजप विरोधी दिग्गज नेत्यांच्या समोर घडत असलेल्या या प्रसंगाने संपूर्ण वातावरण भावविवश बनले.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्यांतील संघर्ष गाजत असताना आणि शरद पवार -अजितदादा यांच्यातील वाद टिपेला पोहोचत असताना रितेशच्या अश्रुंनी राजकारणातील काका-पुतण्याच्या नातेसंबंधाला नवा हुंकारच दिला. दिलीपराव हे स्व.विलासरावाचे धाकटे बंधू.विलासरावांच्या हयातीत विलासरावांच्या स्थानिक राजकारणाची संपूर्ण सूत्रे दिलीपरावांच्याच हाती होती.अमित,धीरज व रितेश ही विलासरावांना तीन मुले तर "मुलीलाच वंशाचा दिवा" मानण्याच्या तत्त्वांचा कृतिशील पुरस्कार करणाऱ्या दिलीपरावांना एकुलती एक कन्या गौरवी.कौटुंबिक जिव्हाळा, एकोपा टिकविण्यात आणि रुजविण्यावर दोन्ही भावांचा सदैव भर राहिला.त्याच कारणाने सिनेमात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण न झालेल्या दिलीपरावांनी रितेशला लहानपणापासून आणि त्याचा पहिला सिनेमा "तुझे मेरी कसम" सिनेमा येई पर्यंत प्रोत्साहनच दिले.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा अमित नुकतेच सक्रिय राजकारणात दाखल झाले होते.पुढे त्याच काळात देशमुख परिवारात काका-पुतण्यांत संघर्षाची ठिणगी पडेल असे अनेकांना वाटत होते. दुर्दैवाने विलासरावांना यकृताच्या आजाराने ग्रासले.त्यावेळी काका-पुतणे एकोप्याने प्रसंगाला सामोरे गेले.रितेशने तर विलासरावांना जीवदान मिळावे यासाठी स्वतःच्या यकृता भाग देण्याची तयारी ठेवली होती. दुर्दैवाने विलासराव कालवश झाले.त्यानंतर राजकीय वारसदारीवरुन देशमुख परिवारात काका-पुतण्यांत संघर्ष होईल,असा अनेकांचा कयास होता.

घडले मात्र वेगळेच दिलीपरावांनी राजकारणातून स्वतः दोन पावले मागे जावून.राज्याच्या राजकारणात अमित यांना पुढे केले.दुसरा पुतण्या धीरज यांनाही आमदार केले. काकाने राजकारणात कुठे थांबले पाहिजे,यांचे उदाहरणच महाराष्ट्रापुढे ठेवले.राजकारणातील काका-पुतण्यांच्या विश्वास आणि प्रेमाच्या या आदर्शाची जणू साक्षच आज रितेशने ढासळलेल्या अश्रुंनी दिली. काल (दि.१८) लातूर जिल्ह्यात स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचा अनावरण स़ोहळा पार पडला.त्यावेळचा हा प्रसंग.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in