"तुमची लायकी नाही हो...", रोहिणी खडसेंनी घेतला शितल म्हात्रेंचा खरपूस समाचार; सुप्रिया सुळेंवर केली होती टीका

"चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा..!"
"तुमची लायकी नाही हो...", रोहिणी खडसेंनी घेतला शितल म्हात्रेंचा खरपूस समाचार; सुप्रिया सुळेंवर केली होती टीका

एका माध्यमसमूहाने अलीकडेच देशातील 100 कर्तृत्ववान महिलांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश केला. त्यावर, शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्या शितल म्हात्रे यांनी टिकास्त्र सोडले होते. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी म्हात्रेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या होत्या शितल म्हात्रे?

"१० एकरात ११० कोटींची वांगी… हा तर चक्क कृषीक्षेत्रातला वैज्ञानिक शोध… वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना लवकरच दिला पाहिजे", असे म्हात्रे एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या. त्यावरून, "शितल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका करायची", अशा शब्दांत खडसेंनी म्हात्रेंचा खरपूस समाचार घेतला.

जशीच्या तशी वाचा रोहिणी खडसेंची पोस्ट -

महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले @sheetalmhatre1 यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिली आहे.आदरणीय सुप्रिया ताई बद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते. शितल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे यांच्या वर टिका करायची. तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार होऊन दाखवा आधी. त्यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा , RTI टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा. चौकशी लागेलं म्हणून स्व पक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रे बाई ने सुप्रिया ताई सुळे यांच्या वर बोलणे म्हणजे शिंदळ बाई ने सावित्री वर चिखल उडवण्या सारखे आहे. शीतल म्हात्रे आपलं चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. आदरणीय सुप्रिया ताई वर टिका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल..! चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकी नुसार वागा..! 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in