Ajit Pawar Plane Crash Case: चौकशीच्या नावाखाली सिंह यांना VIP पाहुणचार; रोहित पवार यांचा आरोप

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीच्या व्ही. के. सिंह यांची झालेली चौकशी हा फार्स आहे. चौकशीच्या नावाखाली सिंह यांचा चांगलाच पाहुणचार करण्यात आला.

चौकशीच्या नावाखाली सिंह यांना VIP पाहुणचार; रोहित पवार यांचा आरोप
चौकशीच्या नावाखाली सिंह यांना VIP पाहुणचार; रोहित पवार यांचा आरोप
Published on

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीच्या व्ही. के. सिंह यांची झालेली चौकशी हा फार्स आहे. चौकशीच्या नावाखाली सिंह यांचा चांगलाच पाहुणचार करण्यात आला.

सिंह हे तब्बल आठ तास सीआयडी कार्यालयात होते, मात्र या काळात त्यांना चहा, नाश्ता आणि जेवणासोबतच चक्क टीव्हीवर भारत विरुद्ध इंग्लंडची क्रिकेट मॅचही दाखवण्यात आली, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

रोहित पवार म्हणाले, या प्रकरणातील चौकशीच्या केंद्रस्थानी असलेले व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना पोलीस प्रशासनाकडून मिळणाऱ्या व्हीआयपी वागणुकीमुळे तपासाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एका गुन्हेगारी तपासाला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीसोबत त्याचे खासगी बंदुकधारी सुरक्षारक्षक कार्यालयात उपस्थित होते तसेच, माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून वाचवण्यासाठी पोलिसांनी सिंह यांना स्वतःच्या काळ्या काचेच्या गाडीतून बाहेर काढले, यावरून तपासावर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते, असे पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in