"दोन दिवस थांबा, मोठा स्फोट होणारंय...", रोहित पवारांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, "५ हजार कोंटीपेक्षा जास्त..."

येत्या दोन दिवसांत ५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार, रोहित पवारांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा
"दोन दिवस थांबा, मोठा स्फोट होणारंय...", रोहित पवारांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, "५ हजार कोंटीपेक्षा जास्त..."

मुंबई: राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनला सुरु होतंय. दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या एका विधानानं राजकीय विश्वात खळबळ उडवून दिली आहे. येत्या २ दिवस घोटाळ्याचा मोठा स्फोट होणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. ५ हजार कोटींच्या कमिशनचा विषय असल्याचं रोहित पवार म्हणाले.

२ दिवस थांबा, फार मोठा स्फोट होणारंय...

रोहित पवार म्हणाले की, "२ दिवस थांबा, फार मोठा स्फोट होणारंय. ५ हजार कोटींपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे. फक्त दोन दिवस थांबा. त्याबाबतच डिटेल ट्वीट मी करेन. जो खुलासा मी करणार आहे. त्यामध्ये विविध खाती आहेत."

रोहित पवारांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

रोहित पवारांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. नीट परीक्षेतील गोंधळासंदर्भात तसेच राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरूनही राज्यपालांना निवेदन दिलं.

ते म्हणाले की, "उत्तराखंडमध्ये पेपरफुटीचा कायदा राज्यात यावा, यासाठी आम्ही अनेक वर्ष प्रयत्नशील आहोत. उत्तराखंडच्या राज्यपालांनी पुढाकार घेऊन तसा कायदा उत्तराखंडमध्ये केला. त्याच धर्तीवर राज्यपालसाहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे किंवा राज्यसरकारला आदेश दिले पाहिजेत. पेपरफुटीवर कायदा लवकरात लवकर करावा यासाठी विनंती आदरणीय गव्हर्नर साहेबांनी केली."

logo
marathi.freepressjournal.in