रोहित पवार यांनी घेतली अजित पवार यांची भेट; अचानक घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधान

ही भेट नेमकी कोणत्या कारणाने घेतली याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र...
रोहित पवार यांनी घेतली अजित पवार यांची भेट; अचानक घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधान
Published on

कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहचल्याने चर्चांना उधान आलं आहे. अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनात मागील अर्ध्या तासापासून चर्चा सुरु आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणाने घेतली याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, जामखेड एमआयडीसीचा मुद्यावर या भेटीत चर्चा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या भेटील कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध मुद्यावर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा सभागृहात मांडला होता. यासंदर्भात त्यांनी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भर पावसात आंदोलन देखील केलं होतं. याच कारणासाठी आज रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

या भेटीत जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांनी एकत्र जेवण केल्याची देखील माहिती समोर आली आहे. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधान आलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांच्या पाठिंब्यावर शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या गटाला आपला पाठिंबा दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in