पत्रकाराला मारहाण प्रकरणी रोहित पवार संतापले ; म्हणाले, "सत्तेची नशा..."

पत्रकार संदीप महाजन यांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पत्रकाराला मारहाण प्रकरणी रोहित पवार संतापले ; म्हणाले, "सत्तेची नशा..."

मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी जळगावच्या पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यातील स्थानिक पत्रकाराला फोनवरुन अश्लिल शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन किशोर पाटील यांनी ही शिवीगाळ केली होती. आता पत्रकार संदीप महाजन यांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल केला आहे.

जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुणपत्ये हत्या करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. यावेळी या घटनेवर भाष्य करणारं एक वृत्त संदीप महाजन यांनी दिलं. होतं. हे वृत्त खटकल्याने आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना फोन करुन अत्यंत अश्लिल अशा भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली होती. अशात आता संदीप महाजन यांना काही जणांनी बेदम मारहान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना "सत्तेची नशा अशी असते का?" असा सवाल केला आहे.

या प्रकरणी ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, "पत्रकाराला फोनवर शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची..का? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून.. विशेष म्हणजे ज्या चौकात या पत्रकाराला मारहाण झाली. त्याच चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचं नाव आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल", असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे. परंतु, पत्राकाराला मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्राकारांनी साधा निषेध करण्याची देखील हिम्मत झाली नाही. हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे", असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in