विधानभवनात रोहित पवारांचं भर पावसात आंदोलन ; म्हणाले, "जोपर्यंत..."

स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे
विधानभवनात रोहित पवारांचं भर पावसात आंदोलन ; म्हणाले, "जोपर्यंत..."

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले आहेत. रोहित पवार यांनी एकट्याने हे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. कर्जत जामखेड मतदार संघातील एमआयडीसीच्या मुद्यावरून रोहील पवारांनी हे आंदोलन केलं आहे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

रोहित पवार यांच्याकडून मागील काही दिवसांपासून कर्जत जामखेडच्या एमआयडीसी प्रश्नावर पाठपूरावा करत आहे. अधिवेशनात एमआयडीसीच्या मुद्याकडे सर्वांच लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलनलाना निर्णय घेतला आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांची भेट घेऊन त्यांना मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या प्रश्नावर कोणतीही अधिसुचना निघेपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतली.

यावेळी विधानसभा अध्यक्षांनी रोहित पवारांचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सभागृहाने एकमताने पुतळ्याने आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोहित पवारांनी त्या ठिकाणी आंदोलन करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि सभागृहाने रोहित पवारांची समजूत घालून त्यांना सभागृहात आणावं असं सांगत रोहित पवार यांनी त्यांचं म्हणणं, प्रश्न त्यांनी सभागृहात येऊन मांडावा, असं देखील विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

राज्याचे नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रोहित पवार यांनी असं आंदोलन करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. या मुद्यावर मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या पत्राचं वाचन केलं आहे. संबंधित मंत्र्यांनी जर याबाबत पत्र लिहून जर काही आश्वासन दिलं असेल तर लोकप्रतिनिधींनी देखील त्याची दखल घ्यायला हवी, यावर चर्चा केली जाईल. पण असं आंदोलन करण योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले. यामुळे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्यामुद्यावर नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in