५० गाड्यांच्या सायलेन्सरवर फिरवले रोलर

भविष्यात असा कुणी प्रकार केल्यास त्यांच्यावर निश्चितच कडक कारवाई करण्यात येईल
५० गाड्यांच्या सायलेन्सरवर फिरवले रोलर

नांदेड : शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बोलमवार यांनी गुरुवारी (दि.८) ५० गाड्यांचे सायलेन्सर काढून त्यावर रोलर फिरवत कारवाई केल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक टारगट मुले ट्युशन परिसरात बुलेट घेऊन फिरत असल्याची खबर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक बोलमवार यांना लागताच त्यांनी एक पथक तयार करून बुम बुम करणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि त्याअनुषंगाने गाड्या पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जवळपास ५० गाड्या पकडण्यात आल्या असून या गाड्यांचे सर्व सायलेन्सर काढून रोलरद्वारे नष्ट करण्यात आले. भविष्यात असा कुणी प्रकार केल्यास त्यांच्यावर निश्चितच कडक कारवाई करण्यात येईल, असेही बोलमवार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in