व्हॅलेंटाईनला फुलांचा राजा गुलाब महागणार

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गुलाबच्या फुलाचे वेगळेच नाते असते. व्हॅलेंटाईन डे असल्याने तरुणाईमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्हॅलेंटाईनला फुलांचा राजा गुलाब महागणार
PM

उमेश पठाडे/छत्रपती संभाजीनगर : प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा लाल गुलाब व्हॅलेंटाईन दिनी महागण्याची शक्यता आहे. सध्या १० रुपये प्रतिनग दर असलेल्या या गुलाबपुष्पासाठी प्रेमदिनी १५ रुपये मोजावे लागू शकतात. या दिनानिमित्त गुलाबाची तब्बल आठ ते दहापट आवक होणार असल्याची माहिती ही फुल विक्रेत्यांनी दिली.

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गुलाबच्या फुलाचे वेगळेच नाते असते. व्हॅलेंटाईन डे असल्याने तरुणाईमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या दिवशी लालेलाल गुलाबांना तरुणाईकडून चांगलीच मागणी असते. वाढत्या मागणीमुळे दरही वाढवले जातात आणि आवकही चार दिवस अगोदर गुलाबाचा दर १० रुपये प्रतिनग होता. मात्र, दोन दिवसापासून तो १५ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती फुलविक्रेते यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना दिली आहे. सध्या २० फुले असलेले दोन-तीन बंडल विक्रीसाठी आणले जातात. परंतु या दिवशी आठ ते दहापट गुलाब विक्रीसाठी आणले जातील, असे हाकम म्हणले. चायनीज गुलाब आणि भारतीय गुलाब असे दोन प्रकारांचे गुलाब असून, या दोन्ही गुलाबांचे दर सारखेच आहेत. टवटवीत, मोठा दिसणारा गुलाब तरुण मंडळी खरेदी करीत असल्याने विक्रेतेही याच गुलाबाकडे आकर्षित होतात. गुलाबांचे बुकेही अनेक जण खरेदी करतात. एरव्ही, हा बुके ६० ते ७० रुपये प्रतिनग मिळतो. परंतु, या दिवशी त्याची किंमत १०० रुपयांपुढे असेल. गुलाबांप्रमाणे विविध गिफ्ट्स खरेदी शनिवारपासून सुरू झाली आहे. सध्या तरुणाई खरेदी करत असल्याची माहीती धूळे या व्यावसायिकांनी दिली. साध्या भेटकार्डपेक्षा सध्या क्रिएटिव्ह भेटकार्ड बाजारात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in