अवघ्या एका सिंगल चार्जमध्ये १५० पेक्षा जास्त किमी व्यवसायिक इलेक्ट्रिक लास्ट माईल सेवा पुरविणाऱ्या भारतातील अग्रगण्य व्यावसायिक इलेक्ट्रिक लास्ट माईल वाहन (ईव्ही) बंगळूर स्थित अल्टिग्रीनने ईव्ही उत्पादनांना चालना देण्यासाठी, एलसीव्हीसह आणि नवीन उत्पादने लाँच करण्यासाठी तसेच देशभरात विस्तार वाढविण्यासाठी सीरीज ए फेरीत सुमारे ३०० कोटी (अंदाजे ४० दशलक्ष अमेरिकी डॉलर) गुंतवणूक उभारली आहे. अल्टिग्रीन ईव्ही तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे.
अल्टिग्रीनने पुण्यातील वाघोली येथे पुण्यातील कार्बन-मुक्त लास्ट माईल डिलिव्हरी सेवा असलेल्या विद्युत परिवहनशी भागीदारी करत अल्टिग्रीन वाहनांसाठी नवीन अधिकृत सेवा केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी अल्टिग्रीनचे संस्थापक आणि सीईओ डॉ. अमिताभ सरन आणि विक्री, सेवा आणि विपणन संचालक देबाशिस मित्रा उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. या सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अल्टिग्रीनचे संस्थापक आणि सीईओ डॉ. अमिताभ सरन म्हणाले की, इतर महानगरांमध्ये विस्तार करत अल्टिग्रीनने औंध येथे पुण्यातील विक्री, विपणन आणि संशोधन व विकास कार्यालयाचेही उद्घाटन केले.