समाजमाध्यमांवर सीईटी परीक्षांची अफवा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सीईटी सेलचे आवाहन

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या बीसीए, बीबीए, बीएमएस, बीएमएम या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा २० आणि २१ जून रोजी घेण्यात येणार असल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरली आहे.
समाजमाध्यमांवर सीईटी परीक्षांची अफवा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सीईटी सेलचे आवाहन
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या बीसीए, बीबीए, बीएमएस, बीएमएम या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा २० आणि २१ जून रोजी घेण्यात येणार असल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरली आहे. याबाबत विद्यार्थ्यांकडून सीईटी सेलकडे विचारणा होऊ लागल्यानंतर सीईटी सेलने याबाबत खुलासा केला आहे. अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

बीसीए आणि बीबीए प्रवेशासाठी या वर्षांपासून महाराष्ट्र सरकार सीईटी घेत आहे. विशेष सीईटी २० जून आणि २१ जून रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थांनी या अगोदर सीईटी दिलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. शक्यतो अर्ज सायबर कॅफेमध्ये जाऊन भरावा, अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे विचारणा केल्यानंतर सीईटी सेलने याबाबत खुलासा केला आहे. समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे कक्षाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in