Pen : पेणमध्ये होणार 'रन फॉर ओवेरियन कॅन्सर'

'रन फॉर ओवेरियन कॅन्सर' रोटरी क्लब ऑफ़ पेण ओरायन (Pen) आणि ओवरकम फाउंडेशन तर्फे उद्या मॅरेथॉनचे आयोजन
Pen : पेणमध्ये होणार 'रन फॉर ओवेरियन कॅन्सर'

स्त्रियांमध्ये वाढणाऱ्या बिजकोषाचा करकरोगाबाबत जनजागृतीसाठी 'रन फॉर ओवेरियन कॅन्सर' या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पेण (Pen) येथील महात्मा गांधी वाचनालय येथून या मॅरेथॉनला सुरुवात होईल. ७ किमी मॅरेथॉनची सुरुवात महात्मा गांधी वाचनालय येथून होईल आणि पेण - खोपोली रोड वरून पनवेल बायपास मार्गे, मुंबई - गोवा महामार्गावरून, कोटकबँक, आईस फॅक्टरी येथून पेण नगरपालिका प्रशासकीय कार्यालयावरून महात्मा गांधी वाचनालय येथे समाप्त होईल. या मॅरेथॉनचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पेण ओरायन आणि ओवरकम फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कॅन्सर म्हणजेच मराठीमध्ये कर्करोग, स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगात दुसऱ्या नंबरचा आणि स्त्रियांना मोठ्या प्रमाणात होणारा कर्करोग म्हणजे बीजकोशाचा कर्करोग स्त्रियांमध्ये बीजकोशाच्या कर्करोगाचे प्रमाण तीन ते चार टक्के आढळते. जवळपास स्त्रियांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये बीजकोशाचा कर्करोग याचा नंबर चौथा आहे या आजाराचा मृत्यू दर साधारणपणे २० ते ८० टक्के म्हणजे तुम्ही जितके निदान लवकर आणि उपचार लवकर इतके वाचन्याचे प्रमाण जास्त आहे. असे पेण येथील प्रसिद्ध स्थिरोक्तज्ञ सोनाली मनीष वनगे यांनी सांगितले. तसेच मॅरेथॉनच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत जनजागृती करण्यात येईल.

७ किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये १४ वर्ष वयोगटापासून ६० वर्ष वयागटापर्यंतच्या व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी मात्र शंभर रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास अल्पोपहार आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच मोफत टी-शर्ट भेट म्हणून दिला जाईल. या मॅरेथॉन मधील विजेत्यांना पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला ५ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला त्याला ३ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २ हजार रुपये यांचे बक्षीस आणि मेडल्स देण्यात येतील. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in