देवीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब गेलो - रुपाली चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा भोंदू अशोक खरातसोबतचा गुवाहाटीतील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
देवीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब गेलो - रुपाली चाकणकर
देवीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब गेलो - रुपाली चाकणकर(Photo-X/@anjali_damania)
Published on

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा भोंदू अशोक खरातसोबतचा गुवाहाटीतील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. चाकणकरांनी या फोटोवर स्पष्टीकरण देत आपल्याला आपल्या गुरूसोबत देवीचे दर्शन करता आले तर छानच होईल, हा अध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून गुवाहाटीला दर्शनासाठी गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.

आपण तिथे कोणाशीही राजकीय चर्चा केली नाही किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो, असे चाकणकर यांनी ठामपणे सांगितले. केवळ श्रद्धेपोटी केलेला हा एक वैयक्तिक दौरा होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची तब्बल ८ तास चौकशी केली. या चौकशीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अशोक खरातच्या कुटुंबासोबतच्या गुवाहाटीतील फोटोवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, अशोक खरातचे कुटुंब अगोदर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर आम्ही कुटुंबासोबत तिकडे गेलो. आपल्या गुरुसोबत दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. अनेकांची श्रद्धा होती. आमचीही होती.

देवीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब गेलो - रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकरांची SITकडून ६ तास चौकशी; भोंदू अशोक खरातप्रकरणी आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

खरातशी कोणतेही आर्थिक संबंध नाहीत

रुपाली चाकणकरांनी यावेळी अशोक खरातसोबत आपला कोणताही आर्थिक व्यवहार नसल्याचेही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, तपास यंत्रणांनी मला जेव्हा केव्हा चौकशीला बोलावले, तेव्हा तेव्हा मी आले. शिर्डी पोलिस ठाण्यात माझ्या बहिणीचीही चौकशी झाली. अशोक खरात प्रकरणात आमचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणी एसआयटीचे प्रश्न वेगळे होते. पोलिसांचे प्रश्न वेगळे होते. समता पतसंस्थेत मी कधीही गेले नव्हते. समता पतसंस्थेत बोगस खाती आहेत. या खात्यांशी किंवा या पतसंस्थेशी माझ्या बहिणीचा कोणताही संबंध नाही. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही.

logo
marathi.freepressjournal.in