

मुंबई : बनावट दस्तावेज सादर करून 'कुणबी' (ओबीसी) जातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रूपाली शिगवण या नगरसेविकेला उच्च न्यायालयाने झटका दिला. खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाऱ्यांना न्यायालय कोणताही दिलासा देऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत न्या. आर. आय. छागला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या खंडपीठाने रूपाली शिगवण यांची याचिका फेटाळून लावली.
शिगवण या डिसेंबर २०२५ मध्ये रायगड येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ८ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. निवडणुकीसाठी त्यांनी महाड उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेले 'कुणबी' जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, निवडणुकीत पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवाराने या प्रमाणपत्राला रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर आव्हान दिले.