सचिन दामोदर शिंगडा यांनी घेतली संजय राऊत यांची भेट; पालघर लोकसभेसाठी लढण्याची इच्छा

शिवसेनेचे संजय राऊत व सचिन शिंगडा यांची सदिच्छा भेट झाल्याने जिल्ह्यात पुन्हा चर्चेला उधाण आले असून, महाविकास आघाडीनुसार पालघरची जागा ही उबाठा शिवसेना लढविणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय सचिन शिंगडा हे मूळ काँग्रेस पक्षाचे आहेत शिवाय, त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे.
सचिन दामोदर शिंगडा यांनी घेतली संजय राऊत यांची भेट; पालघर लोकसभेसाठी लढण्याची इच्छा

जव्हार : आचारसंहिता जाहीर होताच नागरिकांना पालघर लोकसभेसाठी कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून देण्यात येईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जिल्ह्यात प्रमुख पक्षांच्या वतीने अनेक नावे जोडण्यात आली मात्र, २५ वर्ष काँग्रेसकडून खासदार राहिलेले दिवंगत दामू बारकू शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनी शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांची मुंबई येथे भेट घेतली होती. आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील सर्व पक्षांत एकमत झाले असून, संभाव्य खासदार हा पालघर जिल्ह्यातील असावा व त्याचा जनसंपर्क दांडगा असावा. अशी अपेक्षा करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे संजय राऊत व सचिन शिंगडा यांची सदिच्छा भेट झाल्याने जिल्ह्यात पुन्हा चर्चेला उधाण आले असून, महाविकास आघाडीनुसार पालघरची जागा ही उबाठा शिवसेना लढविणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय सचिन शिंगडा हे मूळ काँग्रेस पक्षाचे आहेत शिवाय, त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. दिवंगत खासदार दामोदर शिंगडा यांनी केलेल्या विकासकामाचा सचिन शिंगडा यांना नक्कीच फायदा होईल, असे मानले जाते. सचिन शिंगडा यांची उमेदवारी या निवडणुकीत निर्णायक ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.

logo
marathi.freepressjournal.in