
महाराष्ट्र सरकारने क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडूलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभिनायासाठी महाराष्ट्राचा 'स्माईल अँबेसिडर' म्हणून नियुक्ती केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरहकारकडून या नियुक्तीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सचिनची नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिनला एक खोचक सल्ला देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी एक ट्विट करत सचिनला सल्ला दिला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "प्रिय सचिन, भाजपच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने तुला राज्याच्या 'स्वच्छ मुख अभियान'साठी 'स्माईल अँबेसिडर' म्हणून नियुक्त केलं. हे ऐकून आनंद झाला. पण तुला माहिती आहे का? याचं भाजपाने त्यांचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना पाठिशी घालत आपल्या कुस्तीपटूंचं हसू हिरावून घेतलं आहे. कुस्तीपटू न्याय मागत आहेत. पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. तु जसा आमचा अभिमान आहेस, तसंच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणू तु तुझ्या बांधनांना पाठिंबा दिला पाहिजेस, हे तुझ कर्तव्य आहे. तु यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंचा 'स्माईल अँबेसिडर' होशील अशी आम्हाला आशा आहे." असं ट्विट करत त्यांनी सचिन तेंडूलकरला खोचक सल्ला दिला आहे.