सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या, झाडून घेतल्या स्वतःवर गोळ्या

Sachin Tendulkar’s Security Guard: सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जवानानं स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
Sachin Tendulkar’s Security Guard Suicide

SRPF Jawan Suicide: दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. जामनेर शहरातील त्याच्या मूळ घरी स्वतःवर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

प्रकाश कापडे असे मृत जवानाचे नाव आहे. ते सुट्टी घेऊन त्यांच्या मूळ गावी जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे गेला होते. कापडे (३९) यांनी आपल्या सर्व्हिस गनने स्वत:च्या गळ्यावर गोळी झाडली. त्याच्या मागे कुटुंबात, त्याचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले, एक भाऊ आणि इतर सदस्य आहेत. ही घटना काल (बुधवारी) रात्री दीड वाजता घडली. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत असून आत्महत्येमागील नेमके कारण तपासले जात आहे. "प्राथमिक तपासानुसार, काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, परंतु आम्ही संपूर्ण तपशीलाची वाट पाहत आहोत," शिंदे यांनी IANS ला सांगितले.

कापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून जामनेर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांचे कुटुंबीय, सहकारी आणि इतर ओळखीच्या व्यक्तींची चौकशी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in