"देशातील ८० कोटी लोकं आयतं खातात, रेशन व्यवस्था कायमची बंद करा", सदाभाऊ खोत यांच्या विधानाने खळबळ

सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या विधानामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता
"देशातील ८० कोटी लोकं आयतं खातात, रेशन व्यवस्था कायमची बंद करा", सदाभाऊ खोत यांच्या विधानाने खळबळ

राज्याचे माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असताना. आता सदाभाऊ हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. देशातील ८० कोटी जनता ऐतखाऊ असून त्यामुळे आता देशातील रेशन व्यवस्था कायमची बंद करुन देशाला बलशाली करा, अशी मागणी सदाभाऊ यांनी केली आहे. राज्यासह देशातील कुंटुंबांना रेशनिंग व्यवस्थेचा मोठा आधार आहे. अनेक अर्थतज्ज्ञांकडून सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करण्याची मागणी केली जात आहे. सदाभाऊ खोत यांनी थेट भाजपच्या प्रमुख मुद्याला विरोध केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

बुलढाण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सदाभाऊ म्हणाले की, शेतीवरचा ४० टक्के समाज उरला असून देशात ८० कोटी माणसं आयत खात आहेत. त्यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करुन देशाला बलशाली बनवा. देशातील ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली असून सुमारे ८० कोटी लोक देशात आयतं खातात. जर इतकी माणसं आयतं खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. माणसं भिकारी बनवण्याचे काम सुरु आहे. अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे बोलताना म्हणाले, ज्या ज्या वेळेस माणसाला सगळं फुकट मिळतं समजा त्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत. राजकीय पक्षांची जढाओढ लागली आहे. हे फुकट ते फुकट त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत जालला आहे. प्रत्येकाने श्रण करावे, श्रमावरच देश बलशाली होईल, असं सदाभाऊ म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in