
मुंबई : राज्यात जातीयवाद, दोन समाजात दुजाभाव निर्माण केला जात आहे. याला विरोध करत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने ८ मार्चपासून सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इंग्रजांना देशातून बाहेर काढताना केवळ राजकीय स्वातंत्र्यच नाही तर व्यवस्था परिवर्तनाचा महत्त्वाचा भाग होता. सपकाळ म्हणाले की, स्वातंत्र्याच्या आधीपासून असलेल्या काँग्रेस पक्षाच्या डीएनएमध्येच समाजवाद आहे. जाती भेदाच्या पलिकडे पाहण्याचा वारसा काँग्रेस पक्षाला लाभलेला आहे. सामाजिक सद्भावनेचा तोच वारसा संविधानातही आलेला आहे.