ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना "विंदांचे गद्यरूप" या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा देशातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना "विंदांचे गद्यरूप" या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा देशातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर झाला आहे. डॉ. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार जाहीर होताच साहित्य क्षेत्रातून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.

साहित्य अकादमीने बुधवारी २१ भाषांतील २०२४ सालासाठीच्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा केली. त्यात आठ काव्यसंग्रह, तीन कादंबरी, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आदींचा समावेश आहे. अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी सांगितले की, हिंदीतील नामवंत कवयित्री गगन गिल यांना ‘मैं जब तक आयी बाहर’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

या साहित्यिकांनाही पुरस्कार

इंग्रजीत किरे यांना ‘स्पिरिट नाईटस‌्’ या कादंबरीसाठी, संस्कृतमध्ये दीपक कुमार शर्मा, राजस्थानी भाषेत मुकुट मणिराज, पंजाबीत पॉल कौर, काश्मिरीत सोहन कौल, गुजरातीत दिलीप झवेरी आदींना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या ९१ व्या वर्षीही डॉ. सुधीर रसाळ मोठ्या उत्साहाने साहित्य सेवा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in