सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार मुंबईपर्यंत सोडण्याची मागणी

बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदु दुबे या होत्या
सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार  मुंबईपर्यंत सोडण्याची मागणी

कराड : कराडसह सातारा रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत पुनर्विकास केला जाणार असल्याने कराड येथील कामासाठी १४ कोटी तर साताऱ्यासाठी २१ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. असल्याची व या कामास लवकरच सुरवात होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक डॉ.मिलिंद हिरवे यांनी दिली.मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांची बैठक शुक्रवारी दुपारी पुणे येथील रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयामध्ये पार पडली.

या बैठकीमध्ये मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य व कराड येथील प्रवाशी संघटनेचे प्रतिनिधी गोपाल तिवारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ.मिलिंद हिरवे यांनी ही माहिती दिली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदु दुबे या होत्या.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत बोलताना पुणे विभाग रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे म्हणाल्या,कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस पुणेपर्यंत सोडण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरु असून सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करणे,दादर-पंढरपूर एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करणे व साप्ताहिक कोल्हापूर-सिकंदराबाद व्हाया मिरज,पंढरपूर-सोलापूर-विजापूर-कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करणे तसेच पुणे ते मिरज दरम्यान जेजुरी,लोणंद,सातारा,तारगाव,मसूर,कराड,ताकारी, किर्लोस्करवाडी व सांगली तर व मिरज ते कोल्हापूर दरम्यान वलिवडे,रुकडी येथे या मार्गावरून धावणाऱ्या काही मेल,एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे.मात्र सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हापासून होणार याकडे व्यावसायीक,व्यापारी,प्रवाशानाचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in