कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा

कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ समाजवादी पार्टी आता मैदानात उतरली आहे.
कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा

मुंबई : कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ समाजवादी पार्टी आता मैदानात उतरली आहे. छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन समाजवादी पक्षाने केले आहे. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी याबाबतचे खुले पत्र लिहिले आहे. त्याव्दारे त्यांनी कोल्हापूर परिसरातील सपा कार्यर्त्यांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी कोल्हापूरकरांना आवाहन केले आहे. त्यासंदर्भात लिहिलेल्या खुल्या पत्रात ते म्हणतात की, उच्चवर्णियांच्या सर्वंकष गुलामगिरीतून महाराष्ट्रातील बहुजनांची मुक्तता राजर्षी शाहू महाराज यांनी केली. देश आज निर्णायक वळणावर उभा आहे. तोच वसा जिवंत ठेवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी महाविकास आघाडीच्या आग्रहास्तव उमेदवारी स्वीकारली आहे.

कोल्हापूरला हिंदू-मुस्लीम ऐक्याची महान परंपरा

कोल्हापूर शहराला हिंदू-मुस्लीम ऐक्याची महान परंपरा आहे. अलिकडच्या काळात उसवत चाललेली सामाजिक-धार्मिक वीण कोल्हापूरकरांसाठी चिंतेचा विषय आहे. थेट छत्रपतींचा वारसा असणारी, ज्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे, ज्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वमान्य आहे, असे उमेदवार कोल्हापूरकरांना लाभले आहेत. आपल्या शहराची उज्ज्वल पुरोगामी परंपरा कायम राखण्यासाठी शाहू महाराज लोकसभेत जाणे अगत्याचे आहे, असे आवाहन आमदार रईस शेख यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in