समृद्धी महामार्ग अपघात, राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

समृद्धी महामार्ग अपघात, राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाण्या पोहचले आहेत

बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागल्याने आणि डिझेलची टाकी फुटून आग पसरल्याने 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरून ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या बसमध्ये 32 प्रवासी बसले होते. त्यापैकी 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बुलढाण्या पोहचले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या महामार्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?
बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसला झालेला अपघात अत्यंत भीषण आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे चालक आणि ट्रक चालक अत्यंत बेदरकारपणे कार चालवतात. यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. असे अपघात पुन्हा होणार नाहीत, यासाठी आतापासूनच प्रयत्न व्हायला हवेत.

काय आहे नेमकं प्रकरण ?

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस नागपूर, वर्धा, यवतमाळ येथून प्रवासी घेऊन जात होती. ती विदर्भ ट्रॅव्हल्सची बस होती. सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर बस रस्ता दुभाजकाला धडकली. डिझेलच्या टाकीचा स्फोट होऊन आग लागली, आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in