'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक

अमरावती जिल्ह्यामधील समृद्धी महामार्गावर शुक्रवारी पहाटे एका भरधाव ट्रकने बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत ७ जण ठार झाले असून १९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक
'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडकव्हायरल व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
Published on: 

अमरावती : अमरावती जिल्ह्यामधील समृद्धी महामार्गावर शुक्रवारी पहाटे एका भरधाव ट्रकने बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत ७ जण ठार झाले असून १९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री १२:४५ वाजण्याच्या सुमारास धामणगाव रेल्वे स्टेशनजवळ, समृद्धी महामार्गावरील चॅनेल ९७ वर घडला. एका ट्रकने पुढे चाललेल्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली, ज्यामुळे ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर २१ जण जखमी झाले.

सर्व जखमींना सुरुवातीला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वर्ध्यातील 'अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च' (पूर्वीचे दत्त मेघे इन्स्टिट्यूट) येथे हलवण्यात आले. अदानी इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता, तर एका गंभीर जखमी रुग्णाला उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in