समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला; १ एप्रिलपासून प्रति किमी टोल दरात वाढ, हलक्या वाहनांसह अति अवजड वाहनांनाही फटका

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला आहे. हलक्या वाहनांसह अति अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर टोल दरात वाढ करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ व ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे लिमिटेड’ या कंपनीने घेतला आहे.
समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला; १ एप्रिलपासून प्रति किमी टोल दरात वाढ, हलक्या वाहनांसह अति अवजड वाहनांनाही फटका
Published on

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला आहे. हलक्या वाहनांसह अति अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर टोल दरात वाढ करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ व ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे लिमिटेड’ या कंपनीने घेतला आहे. हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर २ रुपये ६ पैसे, तर अति अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर १३ रुपये ३० पैसे टोल आकारण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८ पर्यंत टोल दरातील ही वाढ लागू राहणार आहे.

११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. ‘मुंबई-नागपूर एक्स्प्रेस-वे’ ७०१ किलोमीटर लांब असून सहा पदरी महामार्ग आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हे अंतर फक्त ८ तासांत गाठणे शक्य झाले आहे. आता या महामार्गावरील टोल दरात वाढ करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ व ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे लिमिटेड’ या कंपनीने घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महागणार असून, आता प्रति किलोमीटर दराने टोल आकारणी करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या दोन एक्सेल असलेल्या म्हणजेच चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रकसाठी ६ रुपये ९७ पैसे प्रति किलोमीटर टोल निश्चित करण्यात आला आहे. कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी किंवा ट्रेलरसाठी १० रुपये ९३ पैसे प्रति किलोमीटर टोल आकारला जाणार आहे, तर सात किंवा त्याहून अधिक एक्सेल असलेल्या वाहनांसाठी १३ रुपये ३० पैसे प्रति किलोमीटर टोल आकारण्यात येणार आहे.

हा राज्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प असून, मुंबई आणि नागपूर दरम्यान प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी तो बांधण्यात आला. या सहा पदरी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर असून, रुंदी १२० मीटर आहे.

असा असेल नवा प्रतिकिलोमीटर टोल दर

-मोटर, जीप, व्हॅन हलकी वाहने : २ रुपये ६ पैसे

-हलकी व्यावसायिक व मालवाहतूक वाहने : ३ रुपये ३२ पैसे

-बस अथवा ट्रक : ६ रुपये ९७ पैसे

-तीन आसनी व्यावसायिक वाहने : ७ रुपये ६० पैसे

-अवजड वाहने : १० रुपये ९३ पैसे

-अति अवजड वाहने : १३ रुपये ३० पैसे

logo
marathi.freepressjournal.in