बीड हिंसाचारावर संदीप क्षीरसागरांचं मोठं विधान; म्हणाले, "मराठा आंदोलकांनी..."

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील क्षीरसागर यांनी भाष्य केलं.
बीड हिंसाचारावर संदीप क्षीरसागरांचं मोठं विधान; म्हणाले, "मराठा आंदोलकांनी..."

नागपूर येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण आणि बीडमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या मुद्यावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या घटनेचा वृतांत सांगितला. यावेळी त्यांनी ती घटना मराठा आंदोलकांनी केली नाही, अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील क्षीरसागर यांनी भाष्य केलं.

बीडमध्ये घडलेल्या हिंसाचारावर आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडमध्ये घडलेली जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. हल्लेखोरांनी मंदिरसुद्धा फोडलं. माझ्या घरी जाळपोळ झाली. पंडितांच्या घरी दगडफेक केली, तिथून बस स्थानकातही दगडफेक केली आणि मग ते निवांतपणे निघून गेले. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे, हे तापसणं गरजेचं आहे.

ते पुढे म्हणाले, छगन भुजबळ साहेबांनी घरी भेट दिली, आपले कौटुंबिक संबंध आहेत. परंतु एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, या घटनेत मराठा समाजाच्या आंदोलनाचा कुठलाही संबंध नाही. इतर समाजाचाही संबंध नाही. ते गावगुंड होते, ते कुणाशी ना कुणाशी निगडीत होते, याचे कॉल रेकॉर्ड काढल्यास ते कुणाशी बोलत होते ते लक्षात येईल.

दरम्यान, बीडमध्ये झालेला हिंसाचार हा मराठा आंदोलनामुळे झाल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या विधानावर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in